
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे आढळली ५० रुपयांची खोटी नोट आढळली
रत्नागिरी जिल्ह्यात खोट्या नोटा चलनात येताना दिसत आहे. खेडमध्ये सलग २ वेळा पाचशेच्या खोट्या नोटा चलनात आल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे ५० रुपयांची खोटी नोट चलनात आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून जिल्हाभरात खोट्या नोटा चलनात आल्या असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनीही व्यवहार करताना याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. www.konkantoday.com