
खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील कचरा हटवण्याची मागणी
खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्यात येत असल्याने कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा कचरा तात्काळ उचलावा अशी मागणी होत आहे. या कचर्यावर भटकी कुत्री, मोकाट जनावरे ताव मारतात. त्यामुळे नागरिकांसह कामगारांच्या जीवाला धोका होतो. काही वेळा कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून येतात व चावा घेतात. असे प्रकार वरचेवर होत असतात. या कचर्यामुळे येथे अनेक लहान मोठे अपघात होत असतात. तरी हा कचरा तत्काळ हटवावा अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com