रत्नागिरी शहरात सीएनजी टंचाई,महानगर गॅस कार्यालयावर रिक्षासेनेची धडक
जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षासेना अध्यक्ष तथा आमदार डॉ.राजन साळवी सूचनेनुसार जिल्ह्यातील सी.एन.जी. तुटवाड्याबाबत महानगर गॅस जे. के. फाईल येथील कार्यालयावर येथे रिक्षासेनेने धडक दिली असून होणार्या तुटवाड्याबाबत माहिती घेतली. यावेळी महानगर गॅस कार्यालय तेथील समन्वयक अमोल शिंदे यांचे सोबत रिक्षासेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय साळवी शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी चर्चा करून माहिती घेतली. झालेल्या चर्चेनुसार त्यांनी गॅस ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी येत असल्याचे सांगत तो वाढवून मिळावा म्हणून त्यांनी गेल कंपनीला पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. तसेच केलेल्या पत्रव्यवहाराची झेरॉक्स कॉपी देण्याचे कबूल केले. तसेच सदर पत्रव्यवहाराची झेरॉक्स कॉपी मिळताच आमदार डॉ.राजन साळवी जिल्हाधिकार्यांशी चर्चा करणार असल्याचे रिक्षासेनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. त्यावेळी रिक्षासेनेचे मिलिंद हातपले, सुरज मालगुंडकर, किशोर कदम, रामा आंबेकर, समीर सावंत, योगेश पानगले, सचिन लाखण, निलेश तोडणकर व अन्य रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.www.konkantoday.com