रत्नागिरी शहरात जलवाहिनी फुटण्याची समस्या कायम
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे जलवाहिनी फुटण्याचा सिलसिला कायम राहिला आहे. महिनाभरापूर्वीच या ठिकाणी जलवाहिनी फुटून परिसर जलमय झाला होता. यावेळीही येथे पाणी साचले होते. रत्नागिरी पालिकेच्या पाणीविभागाचे शदर भिडे, सहकार्यांनी सोमवारी हा बिघाड दुरूस्त केला होता. जयस्तंभ परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच महिनाभरापूर्वी जलवाहिनी फुटली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून जवळच असलेल्या ठिकाणी जलवाहिनी फुटून चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर पसरले होते. जयस्तंभ परिसरात वारंवार पाईपलाईन फुटत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही नळपाणी योजना नव्याने झालेली असून त्याची सतत दुरूस्ती कशी केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. www.konkantoday.com