
चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोलीत वणव्याच्या आगीमुळे गोडावून खाक
चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली एमआयडीसीत गुरूवारी दुपारी १.३० च्या सुमारास लागलेल्या वणव्यात अमर प्लास्टिक कंपनीचे गोडावून खाक झाले. दुपारी सुटलेल्या वार्यामुळे वणव्याचा जोर लक्षात घेवून चिपळूण नगर परिषद, लोटे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी लगतच्या कृष्णा कंपनीच्या अग्निशमन दलाकडूनही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. कंपनी बंद असल्याचे नुकसानीचा अंदाज कळू शकलेला नाही. www.konkantoday.com