पुढील काही दिवस कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज
मळभी वातावरणाचे सावट दूर झाल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील काही दिवस कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (रलो अलर्ट) देण्यात आला आहे. या कालावधीत उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.अरबी सागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आकाश निरभ्र होत झाल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने तापमानात वाढ झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा तसेच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर रत्नागिरी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहिल. ठाणे व पालघर जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होवून ते ४० अंश सेल्सिअस राहील.www.konkantoday.com