संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील शिक्षक अमित पंडित यांना साहित्य सेवक पुरस्कार जाहीर
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील शिक्षक आणि पत्रकार अमित पंडित यांना राष्ट्रीय उत्कृष्ट सहित्य सेवक भाषागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर येथील गरूड फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो.अमित पंडित हे गेली २५ वर्षे लेखन करत आहेत. आजवर ६०-७० कथांचे लेखन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर एकांकिका, अनुवाद ललित लेखन हे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. बाल साहित्यात त्यांनी विशेष लेखन केले आहे. तसेच रशियन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. www.konkantoday.com