
रत्नागिरी तालुक्यातील कशेडी कोंड, साठरेबांबर येथील प्रौढाचे झाडावरून पडल्यामुळे उपचाराच्या दरम्यान निधन
* रत्नागिरी तालुक्यातील कशेडी कोंड, साठरेबांबर येथील प्रौढ लाकडे गोळा करण्यास गेले असता सुकलेल्या फांदीवरून पडले. उपचारांसाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी केईएम हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हनुमंत सोना ताह्मणकर (वय ५७, कशेडी कोंड, साठरेबांबर- रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली होती.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताह्मणकर हे लाकडे गोळा करण्यासाठी गेले असता झाडाची सुकलेली फांदी काढताना ते दहा फुटावरून पडले. त्यांच्या डाव्या पायाला गुडघ्यावर व डाव्या हाताला मार लागला होता. अधिक उपचारासाठी केईएम हॉस्पिटल येथे दाखल केले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केलेwww.konkantoday.com