
संगमेश्वर बसस्थानकासमोरील सावली देणारा महावृक्ष होणार जमीनदोस्त
संगमेश्वर बसस्थानकासमोरील महाकाय वृक्ष मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणाच्या कामामध्ये येत असल्याने त्याच्यावर आता कुर्हाड चालणार आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.हा महावृक्ष व्यावसायिक, रिक्षाचालक, ग्राहक व पक्षांना त्याच्या विशाल फांद्यांनी प्रत्येकावर सावली देत होता. चौपदरीकरणाच्या कामात तो आता तोडला जाणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्येकानी सन्मानाने आपापली दुकानांची जागा मोकळी करून दिल्याने रूंदीकरणाचे कााम आता जोरदार चालू झाले आहे. www.konkantoday.com