रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान
रत्नागिरी:*- रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१७ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २१.१९ टक्के तर तीन वाजेपर्यंत ३३.९१ मतदान झाले होते. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन तासात १०.८२ टक्के मतदान झाले. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६.७२ टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात ४१.६८ टक्के मतदान झाले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ४६.०४ टक्के, कुडाळ मतदारसंघात ४८.४४ आणि सावंतवाडी मतदार संघात ४५.०१ टक्के मतदान झाले आहे.www.konkantoday.com