कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निवडणुकीनंतर मार्गी लागणार असल्याने मतदानावरील बहिष्कार मागे
निवडणुकीनंतर कोकणरेल्वे प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गस्थ लावण्याचे व रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक लावून हा विषय लवकरात लवकर निकाली काढण्ययासाठी नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन मंत्री ना. नारायण राणे व आ. नितेश राणे यांनी दिल्यामुळे निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेत असल्याचे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील नवोदित खासदार यांनी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही तिनही जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची सुमारे १८००० कुटुंबे व त्यांचे सर्व नातेवाईक येत्या निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा ठाम निर्धार करीत असल्याचे कळविले होते.www.konkantoday.com