चिपळूण शहरातील गांधीचौक परिसरातील तब्बल १५ वर्षानी नाल्याची सफाई
चिपळूण शहरातील गांधीचौक परिसरातील जयंत साडी सेंटर लगतच्या एका नाल्याची यावर्षी तब्बल १५ वर्षांनी सफाई होत आहे. अडचणींमुळे इतके वर्षे हा नाला साफ करता येत नव्हता. मात्र यावेळी लगतची इमारत तोडली गेल्याने काम सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरातील अन्य नाल्यांची सफाईही वेगाने सुरू आहे.शहरात लहान मोठी ७० गटारे आहेत. त्यांची साफसफाई नेहमीच केली जाते. मात्र पावसाळ्यात डोंगर भागासह अन्य ठिकाणांहून येणारे पाणी शहरात न अडता ते थेट वाशिष्ठी व शिवनदीत जावे यासाठी असणार्या ४३ नाल्यांच्या सफाईचे काम मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.www.konkantoday.com