
अर्जुना नदीच्या जैतापूर खाडीच्या मध्यभागी असलेल्या जुवे बेटाला जोडणार्या रस्त्याचे स्वप्न साकारणार
अर्जुना नदीच्या जैतापूर खाडीच्या मध्यभागी वसलेल्या आणि चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या राजापूर तालुक्यातील जुवे बेटाला जोडणारा रस्ता उभारणीच्या सर्वेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जुवे बेटाला जोडणारा जुवे बेट खारलँड बंधारा ते देवाचे गोठणे (राघववाडी) मुख्य रस्ता उभारणीच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जुवे बेटाला जोडणारा रस्ता व्हावा, अशी जुवेवासीयांची असलेली मागणी आणि त्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची स्वप्नपूर्ती होण्याच्या दृष्टीने चालना मिळाली आहे. www.konkantoday.com