![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2024/05/images-10.jpeg)
रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीवरील बंधार्याचे काम वेगात
रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीवर हरचिरी येथे एमआयडीसीकडून नवीन कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठा होणार असून उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जाणवणारी पाणीटंचाई मिटविण्यात यश येणार आहे, तसेच उद्योजकांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असून या बंधार्याचे काम वेगाने सुरू आहे.काजळी नदीवर हरचिरीजवळ एमआयडीसीचे छोटे बंधारा पद्धतीचे धरण असून त्यातून रत्नागिरीतील मिरजोळे, उद्यमनगर एमआयडीसीसह १० ते १५ ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा होत असतो. या बंधार्यात अनेक वर्षापासून गाळ साचत आला असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होवून उद्योजकांना पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होत असते. त्यामुळे उद्योजकांना जाणवणार्याा समस्या सोडवताना पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठीही एमआयडीसीकडून प्रयत्न केले गेले. हरचिरी बंधार्याच्या खालील बाजूलाच नवीन मोठा बंधारा उभारला जात आहे. या बंधार्यामुळे उद्योजकांसह रत्नागिरी परिसरातील ग्रामपंचायतींचाही पाणी प्रश्न बर्यापैकी निकाली निघणार आहे. नव्याने बांधण्यात येणार्या बंधार्याची उंची वाढविण्यात येत असल्याने, पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. याच नदीवर अंजणारीपर्यंत एमआायडीसीचे दोन बंधारे आहेत.एमआयडीसीने हाती घेतलेले कोल्हापुरी बंधार्याचे काम वेगाने सुरू असून या बंधार्यात ०.३२० मिलेनियम दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होणार आहे. जुन्या बंधार्यात ०.२९७ मिलेनियम दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होत होता, वाढीव पाणीसाठ्यामुळे उद्योजकांचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. या भागात नदीकिनार्याची धूप होवू नये म्हणून मोठी संरक्षक भिंतही बांधण्यात आली आहे. www.konkantoday.com