रत्नागिरी जवळील गोळप येथील आंबा बागेत हत्याकांड ,दोन नेपाळी भावांची डोक्यात दगड मारून हत्या
* रत्नागिरी शहरात वॉचमन ची हत्या होण्याची घटना ताजी असतानाच गोळप येथील आंबा बागेत काम करणाऱ्या दोन नेपाळी भावांची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे रत्नागिरीतालुक्यातील गोळप येथील आंबा बागेत काम करणाऱ्या नेपाळी दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे ही हत्या आपापसातील वैमनस्यातून झाली असण्याची शक्यता आहे दोन्ही भावांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत आणि डोक्यात दगड घालत दोन्ही भावांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी ऊघड झाली.घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. दोन्ही नेपाळी भाऊ मुकादम यांच्या बागेत मागील सहा महिने कामाला होते. सोमवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने रत्नागिरी हादरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून आता खुना सारख्या घटना घडू लागल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहेwww.konkantoday.com