मुंबई-गोवा महामार्गावरील मानसकोंड येथे पोलिसांच्या वाहनाला दुचाकीस्वाराची धडक
मुंबई-गोवा महामार्गावरील मानसकोंड येथील क्रशरजवळ पोलीस वाहनाला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसलेला चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. संदीप जाधव (४८,सायन, मुंबई, मूळ रा. लांजा भडे आणि विनोद जाधव) अशी जखमींची नावे आहेत. जखमी दुचाकीस्वार संदीप याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. www.konkantoday.com