रत्नागिरी जिल्ह्यात सापडतोय कातळशिल्पाचा खजिना
गेल्या १२ वर्षात कातळशिल्प शोधकार्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कातळशिल्प ठिकठिकाणच्या गावांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. या गावात १९० ठिकाणी २२०० पेक्षा अधिक कातळशिल्प उजेडात आली आहेत. नुकतीच कोळंबे ओझरवाडी येथील स्वयंभू श्री रक्षणेश्वराच्या सड्यावर ४२ काातळशिल्पांचा समूह ग्रामस्थ घनश्याम उर्फ बापू फडके यांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आला असून येथे स्वच्छता, संशोधनास सुरूवात झाली आहे. लवकरच नवीन ठिकाणांसह अजून खूप काही समोर येणार आहे. ज्यावर सध्या सविस्तर काम चालू आहे.www.konkantoday.com