
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणेनजिकच्या गोडसई येथे फॉरच्युनर कार व ट्रेलर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकासह कारमधील एकजण गंभीररित्या जखमी झाला. महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.कंटेनर चालकासह कारमधील जगदीश पांडुरंग मुर्टे (६६, रा. परेल-कोळीवाडा, मुंबई) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. वृद्ध जखमीस उपचारासाठी तातडीने पनवेल-कामोठे येथील एम.जी.एम. रूग्णालयात दाखल केले. नागोठणे येथून कोलाकडे जाणार्या एम.एच. ४६/ए.एफ. ७६८३ व कोलाडहून मुंबईकडे जाणार्या एम.एच. ४३/बी.ई. १२३५ क्रमांकाची फॉरच्युनर कार यांच्यात अपघात झाला.www.konkantoday.com