चिंचवली, घेरारसाळगडमधील १७५ ग्रामस्थ पाण्यासाठी करीत आहेत वणवण
खेड तालुक्यातील चिंचवली येथील दोन तर घेरारसाळगडातील दोन वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी येथील प्रशासनाकडे अर्ज दाखल करूनही अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. दोन्ही वाड्यातील १७५ ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहे. याशिवाय टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज दाखल केलेल्या खोपी-अवकिरेवाडी, मानेवाडी येथील ग्रामस्थांना दीड महिन्यांचा कालावधी लोटून देखील अद्याप टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. www.konkantoday.com