लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांत फूट
जातनिहाय जनगणना आणि आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला महाप्रचंड समाज या मुद्यावर एकत्रित आलेल्या ओबीसी संघटनांत फूट पाण्यात राजापूर तालुक्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेले दिसत आहे. तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष व राजापूर ओबीसी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी भाजपात प्रवेश केल्याने तालुका ओबीसी संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने आता तालुक्यातीलच ओणी येथील असलेले व प्रदेश स्तरावर ओबीसी संघर्ष मोर्च्याचे कार्याध्यक्ष असलेले चंद्रकांत बावकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.www.konkantoday.com