मुंबई – गोवा महामार्गावर खेड खोपी फाटा येथे मोटरसायकल डंपरखाली गेल्याने चालक ठार
मुंबई – गोवा महामार्गावर खेड खोपी फाटा येथे नियंत्रण सुटलेली मोटरसायकल समोरून येणाऱ्या डंपरखाली गेल्याने त्याचा चालक ठार झाला. अरुण रामदुलर जैस्वाल, (३७) असे मृताचे नाव आहे. अपघाताची माहिती अशी की, मोटरसायकल क्रमांक (एम एच ०८ बीबी ५९०१) ही खेड वरून चिपळूणच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती (एम एच ०६ बिडी ०९८२ ) या डंपरखाली गेली. डंपर चिपळूणहून खेडकडे येत होता. त्याच्या चाकाखाली सापडलेला मोटरसायकलवरील चालक गंभीर जखमी झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली उभी असणारी नाणीजधाम येथील श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यातून रुग्णाला कळंब उपजिल्हा रुग्णालयातदाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर जखमीला मृत घोषित केले. अरुण रामदुलार जैस्वाल ( ३७, रा.नाशिक) असे मृताचे नाव आहे.
www.konkantoday.com