
बदलत्या हवामानाचा मासेमारीवर परिणाम, मासळीची आवक घटली
सध्या अवकाळी पाऊस व कडाक्याच्या उष्मा त्यातच समुद्रात वाहणारे वारे यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी बोटी जात नसल्याने मासळीचा दुष्काळ जाणवत आहे. मासळीची आवक घटल्याने दर मात्र तेजीत असल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे.सध्या सुट्ट्या, लग्नसराई, विविध उत्सव, यात्रांसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी व पर्यटक गावाकडे आले आहेत. ही मंडळी मच्छीसाठी आग्रही असते. परंतु या मासे खवय्यांना मनासारखे मासे खाता येत नाहीत. कारण समुद्रात होणार्या वादळांमुळे मच्छिमार बोटी घेवून मच्छिमारीसाठी समुद्रात जात नाहीत. त्यामुळे माशांची आवक घटली आहे. अगदी तुरळक मच्छी बाजारात आढळते. त्याचा दरही गगनाला भिडलेला असतो. चढ्या दराने काही खवय्ये मच्छी खरेदी करताना दिसतात. परंतु आवडीची व मनाजोगी मासळी मिळत नसल्याने खवय्यांमध्ये नाराजी आहे. www.konkantoday.com