एसटी बसची दुरावस्था लांब पल्ल्याच्या बसमध्ये आसनालगत चक्क टायर
एसटी महामंडळाच्या ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या ठिकाणी मार्गस्थ होणार्या एसटी बसेसची अवस्था ऐशी की तैशी झाली आहे. लांबपल्ल्याच्या बसमधील प्रवास देखील प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बुधवारी रात्री सुटलेल्या भांडूप-खेड-कांदोशी बसच्या एका आसनालगत ठेवण्यात आलेल्या टायरवर पाय ठेत प्रवासी महिलेस लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागला.भांडूप-खेड-कांदोशी बस बुधवारी रात्री ठाणे-खोपट बसस्थानकात आली असताना महिला प्रवासी खेडला येण्यासाठी बसमध्ये चढली. बसमधील आसनावर बसल्यावर सीटच्या लगतच टायर ठेवल्याचे निदर्शनास आले. मात्र अन्य आसनावर जागा नसल्यामुळे त्या महिला प्रवाशाचा टायर ठेवलेल्य आसनालगतच बसावे लागले. आधीच या एसटी बसची अवस्था बिकट होती. त्यात टायरची नवी भर पडल्याने प्रवाशांनी संतापच व्यक्त केला. www.konkantoday.com