संगमेश्वर बसस्थानकातील आरक्षण तीन महिने बंद, प्रवाशांची गैरसोय
संगमेश्वर बसस्थानकातील आरक्षण गेले तीन महिने बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.संगमेश्वर बसस्थानकात मुंबई, गोवा, पुणे, कोल्हापूर आदी शहरांकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते. संगमेश्वर बसस्थानक हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून गावातील वाडीवस्तीतील चाकरमान्यांसह शहराकडे जाण्यासाठी प्रवासी वर्ग या ठिकाणी येत असतात. मात्र, आरक्षण कक्ष बंद असल्याने प्रवाशांना आरक्षण करणे शक्य होत नाही. प्रवाशांना होणार्या त्रासाचा विचार करून आरक्षण सुरू करावे अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com