रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता अद्यावत पॉस मशिन वाटप
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता अद्यावत पॉस मशिन वाटप रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आता अद्यावत पॉस मशिन वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये पुरवठा विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या पॉस मशिन आता रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात तब्बल ९४७ नवीन ५-जी पॉस मशीन दाखल झाल्या आहेत. यामुळे आता ५-जी पॉस मशीन मिळाल्यामुळे रेशनधान्य दुकानदार आणि ग्राहकांकडून व्यक्त केली जाणारी नाराजी दूर होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. २०१७ मध्ये या सर्व रेशन दुकानांना पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात आली होती. या पॉस मशिनच्या देखरेख दुरूस्तीचे काम एका खाजगी संस्थेला देण्याात आले होते. पाच वर्ष पूर्ण होवूनही सर्व रेशन दुकानदार शासनाकडून मिळालेल्या पाच पॉस मशिनचा वापर करत आहेत. शिधा वाटप करताना या जुन्या पॉस मशिनमुळे खूप अडचणी येत होत्या. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडून आता जिल्ह्यातील ९४३ रेशन दुकानांसाठी तब्बल ९४७ पॉस मशिन प्राप्त झाल्या आहेत. www.konkantoday.com