कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक अचानक बंद, गुरूवारी वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावरील दुहेरी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून वेगाने हालचाली सुरू असतानाच बुधवारी रात्रीपासून बोगदा अचानक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गुरूवारी दिवसभर वाहतूक ठप्प होती. त्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारे वाहनचालक बुचकळ्यात पडले. बोगद्यानजिक गर्डर चढवण्याच्या कामामुळे वाहतूक बंद केल्याचे कारण राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून देण्यात आले.www.konkantoday.com