आखाती देशांसह अमेरिकन, युरोपीयन देशानाही पडली हापूसची भुरळ
भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, युकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईमधील विकिरण सुविधा केंद्रातून आतापर्यंत ६०२ टन आंब्याची निर्यात झाली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ८० हजार ते १ लाख पेट्यांची रोज आवक होत आहे. कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून येणारा आंबा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक मार्केटबरोबर विदेशातही पाठविला जात आहे. आखाती देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होत असला तरी आता युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील अनेक देशांमधूनही मागणी वाढत आहे. www.konkantoday.com