लांजा तालुक्यातील वेरवली येथे देशी-विदेशी दारू विक्री करणारी महिला ताब्यात
विनापरवाना देशी-विदेशी मद्याची विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीच्या पथकाने लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रूक डोळसवाडी येथे धाड टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ३ हजार ४४५ रुपयांचा गावठी तसेच विदेशी मद्याचा साठाही जप्त करण्यात आला आहे. वेरवली बुद्रूक डोळसवाडी या ठिकाणी एक महिला देशी-विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने वेरवली बुद्रूक डोळसवाडी येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजता धाड टाकली. त्यावेळी तृप्ती जितेंद्र डोळस (४२, रा. वेरवली बुद्रुक, डोळसवाडी) ही महिला गावठी हातभट्टीची दारू तसेच विदेशी मद्याच्या सारूसाठ्यासह आढळून आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी पोलिसांनी टाकलेया या धाडीत ५५० रुपयांची पाच लिटरची गावठी एकूण ३ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.www.konkantoday.com