मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने रत्नागिरीतील ३० मतदान केंद्रांची धुरा यंग ब्रिगेडकडे
मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग विविध योजना राबवत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती, सुविदांची उपलब्धता, टपाली मतदान सेवेचा विस्तार आदी उपक्रमांबरोबरच मतदान केंद्राच्या रचनेतही नवनवे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या लोकसभेसाठी पूर्णपणे महिलांच्या नियंत्रणाखालील मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केेंद्रे स्थापन केली जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अशी प्रत्येकी ३० मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील ३० मतदान केंद्रांची धुरा यंग ब्रिगेडकडे सोपविली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. www.konkantoday.com