बारामती मध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

* राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. काही ठिकाणी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काल (सोमवारी) उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या एका उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.लोकसभेच्या निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button