पावसः गौतमी नदीचे पात्र गाळ उपसाच्या प्रतिक्षेत आहे
पावसमधील गौतमी नदी मागील वर्षी राज्य शासन व नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक नियोजनातून निधी उपलब्ध झाल्यामुळे गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पाण्याची स्त्रोत बळकट झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध असूनही गाळ उपसण्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. पाच वर्षांपूर्वी गौतमी नदी गाळमुक्त होण्याकरिता प्रथम सुरवात करण्यात आली. मागील वर्षी जिल्हा वार्षिक नियोजनातून गाळ उपसासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध मिळाला. त्यातून पावस ग्रामपंचायत, राज्य शासन आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून पावस ग्रामपंचायत ते गणपती मंदिर असा सुमारे ४०० मीटर लांबीच्या आणि पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंच अशा पद्धतीने नदीतील गाळ उपसण्यात आला. त्यामुळे नदीपात्र खोल झाले. पाण्याचे स्त्रोत मोकळे झाले. त्यामुळे यावर्षी बंधारा बंदिस्त केल्यामुळे पाणीसाठा चांगल्या प्रकारे झाला. पुढील टप्प्यासाठी १८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून दुसऱ्या टप्प्यातही चांगले काम होऊ शकते. एप्रिल संपत आला तरी कामाबाबत कोणत्याही हालचाली अद्याप दिसून येत नाहीत. सध्या अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्यामुळे मागील वर्षाप्रमाणे पाऊस उशिरा येणार नसल्याने कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने गाळ उपसा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे, या संदर्भात माहिती घेतली असता नाम फाउंडेशनची कामे विदर्भ, मराठवाडा या भागात सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी निधी उपलब्ध असून गाळ उपसण्याचे काम रखण्याची शक्यता निर्माण झाली आहे. www.konkantoday.com