
शिक्षक व ग्रामस्थांनी मिशन राबवून अवघ्या दीड महिन्यात शाळेचे रूप पालटले
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजुर्ली नं. २ या शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांनी मिशन आपुलकी अंतर्गत अवघ्या दीड महिन्यामध्ये शाळेचा कायापालट केला आहे. आदर्श मतदान केंद्र भेटीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ग्रामस्थ व शिक्षक यांचे कौतूक केले आहे.रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच प्रांत अधिकारी श्री. शिवाजी जगताप, गुहागर तालुक्याचे तहसिलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी सुद्धा या शाळेला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी यथोचित सत्कार केला.www.konkantoday.com