कार्यकर्त्यांना दोन दिवसात सूचना देणार, नाराज नाही म्हणूनच आलो -किरण सामंत
पत्रकारांशी बोलताना भैय्या सामंत यांनी सांगितले की, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे आणि महाराष्ट्रात ४५५ पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठीच मी वरिष्ठांशी चर्चा करून माघार घेतली. कार्यकर्त्यांना दोन दिवसात सूचना देवू, नारायण राणेंना निवडून आणायचे आहे. मी बिलकूल नाराज नाही. नाराज असतो, तर आलो नसतो, मला वरिष्ठांनी आश्वासन दिलेले नाही, परंतु कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत.ते म्हणाले की, ही जागा शिवसेनेला मिळाली असती तर बरं झालं असतं. कोकणात शिवसेना रूजली होती. मालवण व कुडाळमधील कार्यकर्ते काम करणार नाहीत, असे माझ्या कानावर आले परंतु सर्वांशी संवाद साधून ते काम करतील, काहींनी राजीनामे दिले आहेत. यावर ते म्हणाले की, नाराजी राहणार नाही. परंतु दोन दिवसात नाराजी दूर करू, सर्व शिवसैनिक कामाला लागतील. येणार्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात निवडून द्यायचे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये धनुष्यबाण नाही या प्रश्नावर भैय्या सामंत म्हणाले की, कोकणी जनता धनुष्यबाण कधीच विसरणार नाही, आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाण दिसेल. एकनाथ शिंदे यांना फसवले जात आहे, असा आरोप होतोय, या प्रश्नावर हा फक्त आरोप आहे, यात तथ्य नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शक्तीप्रदर्शनावेळी प्रमोद जठार, अतुल काळसेकर, बाळ माने, राजन तेली यांच्यासमवेत अनेक नेते मंडळी उपस्थित होती.www.konkantoday.com