आकाशात जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत देशाची राज्यघटना बदलली जाणार नाही-सुनिल तटकरे
*आकाशात जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत देशाची राज्यघटना बदलली जाणार नाही. विरोधकांकडून चुकीचा प्रचार केलं जातोय. निवडणूक आल्यावरच संविधानाची आठवण कशी येते? असा संतप्त सवाल रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना केला.देशात संविधान बदलण्यासाठी एनडीएला ४०० जागा हव्या आहेत. अशी टिका विरोधकांनी केली होती. त्याबाबत सुनील तटकरे यांनी नमहाड तालुक्यातील विन्हेरे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीची भव्य जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्वधर्मसमभाव राखला जावा म्हणून भरीव काम करण्याची भूमिका आम्ही घेत आलो आहोत. अनेक वर्ष धार्मिक सलोखा राखण्याचं काम केलंय. नवाब मलिक अल्पसंख्याकमंत्री असताना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला निधी वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्याकाळच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला नाही. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी निधी वाढवून दिला असं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.www.konkantoday.com