प्रचाराच्या दरम्याने धमकी मिळाल्याने अपक्ष शकील सावंत यांना पोलीस संरक्षण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून कोकण प्रादेशिक पक्षातर्फे अपक्ष निवडणूक लढविणारे शकील सावंत यांना प्रचारादरम्यान धमकी मिळाल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. अखेर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गुरूवारी त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. बंदूकधारी पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पूर्णगड येथे प्रचारादरम्यान शकील सावंत यांना आश्रफ सारंग यांनी अडथळा करीत ते त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते. तसेच तत्काळ पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. दरम्यान पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनानुसार शकील सावंत यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती कोकण स्वराज्य कोकण प्रादेशिकपक्षाचे संयोजक ऍड. ओवेस पेचकर यांनी दिली.www.konkantoday.com