लांजा तालुक्यातील पनोरे कवचे वाडी येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या इसमाने तिघांवर केला पहारी व कुऱ्हाडीने हल्ला, एकाचा मृत्यू
लांजा तालुक्यातील पनोरे कवचे वाडी येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या इसमाने तिघांवर पहारी व कुऱ्हाडीने हल्ला करण्याची घटना घडली आहे
लांजा तालुक्यातील पनोरे कवचे वाडी येथे मानसिक संतुलन बिघडलेल्या 45 वर्षीय शैलेश कांबळे यांने कुऱ्हाड, पहारच्या साह्याने तिघांवर हल्ला केला. यातील जानू रघुनाथ कवचे( वय 70) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी शैलेश कांबळे याला ताब्यात घेतले आहे
लांजा तालुक्यातील पनोरे गावात शैलेश कांबळे हा इसम राहतो. त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक त्याने शेजारी राहणाऱ्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली. सुरेश कवचे , यांना मारहाण करत असताना जानू रघुनाथ कवचे हे काय झाले हे पाहण्यासाठी पुढे आले असता शैलेश कांबळेयाने तेथीलच धारदार फरशी घेऊन त्यांच्यावर हल्ला करत वार केले. त्यानंतर जानू कवचे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना रुग्णालयात हलवण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तर मारहाण केलेल्या सुरेश कवचे, सुरे कवचे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस तपास सुरू आहे
www.konkantoday.om