प्रचंड उष्णतेमुळे जलसाठ्यांची होतेय वेगाने वाफ
दिवसागणिक वाढलेले तापमान तीव्र पाणीटंचाईकडे घेवून जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्याही तीव्र होत आहे. चालू एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील ४६ लघुपाटबंधारे धरणांमध्ये एका आठवड्यात प्रचंड बाष्पीभवनामुळे सुमारे १६६ द.ल. घ. मी. पाणीसाठा घट्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. आता या धरणात १११.४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्याची एकूण ४७.१२ टक्केवारी आहे.जिल्ह्यात ३ मध्यम धरण प्रकल्प तर ४६ लघु पाटबंधारे धरण प्रकल्प आहेत. त्या तिन्ही मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. आठवड्यात नातूवाडी ४९.८२ टक्के, गडनदी ६७.७० टक्के, अर्जुना धरण प्रकल्पात ८७.०७ टक्के पाणीसाठा होता. असह्य उकाड्यामुळे आठवड्यामध्ये या धरणातील पाणीसाठा घटला आहे. त्यामध्ये नातूवाडी धरणामध्ये शुक्रवारपर्यंत उपयुक्त पाणीसाठा ४५.७५ टक्के होता. गडनदी प्रकल्पात ६६.२२ टक्के, तर अर्जुना प्रकल्पामध्ये ८७.८८ टक्के असा पाणीसाठा आहे. या गेल्या आठवड्यात सुमारे १.६६ दल. घ. मी. एवढा पाणीसाठा कमी झाला असल्याचा अहवाल पाटबंधारेच्या आकडेवारीनुसार दिला आहे. www.konkantoday.com