देवरूख नगर पंचायतीने लावलेल्या दिशादर्शक फलकांची दुर्दशा
देवरूख नगर पंचायतीने लावलेल्या दिशादर्शक फलकांची सध्या दुर्दशा झाली आहे. यामुळे बाहेरहून देवरूख नगरीत येणार्याा वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे नगर पंचायतीने लक्ष देवून दिशादर्शक फलकांची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्यातून हजारोंच्या संख्येने जनता देवरूख नगरीत येते. बाहेरून अनेक वाहनचालक कामानिमित्त देवरूखमध्ये येतात. शहरातील सर्व रस्ते एकमेकांना जोडलेले असल्याने अनेकवेळा वाहनचालक भरकटतात. याचीच दखल देवरूख नगर पंचायतीने घेत देवरूखात महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलकांची उभारणी केली आहे. वाहनचालक व नवीन येणार्या नागरिकांच्या दृष्टीने सोयीची बाब आहे. मात्र सध्या या दिशादर्शक फलक मांडलेल्या अवस्थेत आहेत. अर्धी-अर्धी नावे तुटलेली आहेत. हे विदारक चित्र आहे. www.konkantoday.com