फडणवीसांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर किरण सामंत प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिंदे गटाचे इच्छूक उमेदवार किरण सामंत यांनी रविवारी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर जाण्यापूर्वी किरण सामंत यांनी आपण रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंत यांना खरोखरच रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उमेदवारी मिळणार का, याविषयी अनेकांना उत्सुकता होती. परंतु, फडणवीसांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर किरण सामंत प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले. नागपूरच्या देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर किरण सामंत हे प्रसारमाध्यमांशी बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ते मीडियाशी न बोलताच निघून गेले. फडणवीसांच्या बैठकीवेळी किरण सामंत यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी मीडियाशी बोलणे टाळले. परंतु, किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून लढण्यावर अजूनही ठाम आहेत. किरण सामंत यांनी बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचे म्हटले होते.मात्र रत्नागिरीत आज शिंदे शिवसेनेच्या वतीने किरण सामंत यांच्यासाठी चार फॉर्म घेण्यात आल्याने सामंत यांची नेमकी काय रणनीती आहे हे स्पष्ट झालेले नाही त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत काय कौल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. www.konkantoday.com