आमदार राणे हे दुसरे किरीट सोमय्या असून, त्यांचीही सीडी फडणवीसच बाहेर काढतील- युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक
भाजप नेते किरीट सोमय्या रोज पत्रकार परिषद घेत, राजकीय मंडळींना ‘ब्लॅकमेल’ करायचे. त्यांची आज अवस्था काय आहे? तेही आपला ‘बॉस’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगायचे.आमदार नितेश राणेही आपला ‘बॉस’ सागर बंगल्यावर असल्याचे सांगतात. आमदार राणे हे दुसरे किरीट सोमय्या असून, त्यांचीही सीडी फडणवीसच बाहेर काढतील, अशी टीका उद्धवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार राणे रोज उद्धवसेनेच्या नेत्यांवर टीका करत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी १० वर्षांत काय केले? अशी विचारणा ते करतात. पण खासदार राऊत हे दहा वर्षेच खासदार आहेत. तुमचे वडील गेली ३४ ते ३५ वर्षे येथील आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री म्हणून काम करतात. त्यांनी किती रोजगार व किती विकास केला? याबाबतचा जाब ते वडिलांना विचारणार आहेत का? ही हिंमत ते दाखविणार आहेत का? असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.www.konkantoday.com