शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या तरुणाच्या दुचाकीस मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे अपघात, तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
चिपळूण- शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या तरुणाच्या दुचाकीस मुंबई-गोवा महामार्गावरील असुर्डे येथे उतारात रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अपघात हाऊन यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना अखेर त्याची प्राणज्योत मालवली.प्रशांत सीताराम गुरव (२५, असुर्डे-गुरववाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत हा शिमगोत्सवासाठी असुर्डे येथे गावी आला होता. रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास तो सावर्डे येथून असुर्डे येथे एकटाच दुचाकीने येत होता. यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना तो असुर्डे येथील उतारात आला असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावर कोसळल्याने यात प्रशांत याच्या डोक्यासह चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.अपघातानंतर त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेची माहिती सावर्डे पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले होते. प्रशांत याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना त्याचे निधन झाले. प्रशांत हा नुकताच मुंबई येथे कामाला लागला होता. www.konkantoday.com