देवरूख बाजारपेठेतील मेडिकलमधून ५० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविणार्या तरूणाच्या मुसक्या देवरूख पोलिसांनी आवळल्या
देवरूख बाजारपेठेतील मेडिकलमधून ५० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविणार्या तरूणाच्या मुसक्या देवरूख पोलिसांनी आवळल्या आहेत. तरूणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार अनिल डोंगरे, रा. साडवली कासारवाडी यांनी फिर्याद दिली आहे. देवरूख एस.टी. स्टँड समोरील महावीर मेडिकलमधून ५० हजाराची रोख रक्कम अज्ञात तरूणाने लंपास केली होती.ओंकार डोंगरे हे ग्राहकांना औषधे देत असताना चोरटा काऊंटरवर ठेवलेली ५० हजार रुपयांचे रोख रक्कम चोरी करून निघून गेला.डोंगरे यांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता एका तरूणाने रोख रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार डोंगरे यांनी चोरीबाबत देवरूख पोलीस ठाण्यात निर्याद दिली. यानुसार अज्ञात तरूणावर ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. देवरूखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. केवळ तीन तासांमध्ये चोरीचा छडा लावण्यात देवरूख पोलिसांना यश आले असून या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, हेड कॉन्स्टेबल सागर मुरूडकर, हेड कॉन्स्टेबल संदीप जाधव सहभागी झाले होते. देवरूख पोलिसांनी आंबवली पाल्येवाडी येथील २८ वर्षीय तरूणाला ताब्यात घेत अटक केली आहे. www.konkantoday.com