आता गॅस सिलेंडरवर स्टीकर लावून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी होणार मतदान जागृती
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चिपळूण प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. शहरात पथनाट्याद्वारे होणार्या मतदान जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही जनजागृती तालुक्यातील घरोघरी पोहोचावी यासाठी आता स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचा आधार घेतला जाणार आहे. या गॅस सिलेंडरवर जनजागृतीपर स्टीकर्स लावले जात आहेत. याद्वारे मतदार राजाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले जात आहे. उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे यांची ही संकल्पना असून शहरातून या जनजागृतीला शुक्रवारपासून सुरूवातही झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.www.konkantoday.com