रत्नागिरी तालुक्यातील उक्षी चेकपोस्ट येथे गावठी गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो टेम्पो पकडला
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी चेकपोस्ट येथे गावठी गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांकडून पकडण्यात आला. ही कारवाई बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलिसाांनी दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच टेम्पोसह दोन गुरे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली.मोहन नारायण रहाटे (५४, रा. देवधामापूर संगमेश्वर) व सचिन प्रकाश रहाटे (३५, रा. नांदळज, रहाटेवाडी ता. संगमेश्वर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ एप्रिल २०२४ रोजी उक्षी चेकपोस्ट येथे संशयास्पदरित्या मॅक्झिमो टेम्पो पोलिसांना आढळून आला. या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गुरे असल्याचे दिसून आले. याबाबत चालकाजवळ पोलिसांनी चौकशी केली असता प्राणी वाहतूक करण्यासंबंधी कोणताही परवाना नसल्याचे आढळले. या प्रकरणी ग्रामीण पोलिसाांनी टेम्पोमधील दोन्ही संशयिताविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com