रत्नागिरी करांनो मतदान करा प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचे आवाहन
_नमस्कार रत्नागिरीकर.. कसे आहात..मजेत ना.. असेच मजेत रहा.. मी प्रवीण आमरे..येत्या ७ मे रोजी लोकसभेची निवडणूक होत आहे. जगात सर्वात मोठी असणाऱ्या आपल्या भारतीय लोकशाहीचा हा उत्सवच आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवक-युवतींना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो. तुमच्या प्रत्येकाच्या एक-एक मताने आपली लोकशाही आधिक बळकट होणार आहे. या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदार नेहमी आग्रेसर असतात. त्यांचा हाच आदर्श आपण घेवूया आणि त्यांच्या बरोबरीने आपण सर्वजण मतदान करुया..! जयहिंद..जय लोकशाही..!