रत्नागिरी शहरात पाणीटंचाईमुळे १५ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा
रत्नागिरी शहरात पाणीटंचाईमुळे आठवड्यातून दोनवेळा कपात केली जात आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता गतवर्षीप्रमाणे १५ एप्रिलपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. लवकरच त्या संदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहे.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या पानवल धरणातून सध्या पुरवठा होवू शकत नाही. या धरणातून पाणीपुरवठा पुन्हा सुरू व्हावा यासाठी योजना हाती घेण्यात आली आहे.शीळ धरणातील पाणी पातळीकडे नगगर परिषद प्रशासन लक्ष ठेवून आहे. दैनंदिन जलपातळी आणि जूनपर्यंत करावा लागणारा पाणीपुरवठा यांचा विचार करता एक दिवस आड करून पाणीपुरवठा वेळापत्रक लागू करावे लागेल, असे प्रशासनाला वाटत आहे. त्या संदर्भात नागरिक सूचना येत्या २-३ दिवसात जारी होणार आहे.पाणीसाठा पातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. १५ एप्रिलपासून पाणी पुरवठ्यासंदर्भातील वेळापत्रक ठेवण्याविषयी येत्या २-३ दिवसात नागरिक सूचना जारी करण्यात येईल, असे रत्नागिरी नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता अविनाश भोईर यांनी स्पष्ट केले.www.konkantoday.com