भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास भीक मागण्याची वेळ येईल, माजी आमदार रमेश कदम

भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास भीक मागण्याची वेळ येईल, माजी आमदार रमेश कदम केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आली तर सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांवर भीक मागण्याची वेळ येईल. घटना बदलून आपल्याला देशोधडीला लावतील. कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. शासकीय यंत्रणांचा वापर करून सर्वसामान्यांना वेठीस धरून राज्य कारभार केला जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणूक हीच संधी असून एकत्र या, एकजुटीची ताकद दाखवा आणि मुजोर सत्ताधार्‍यांना खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी आमदार रमेश कदम यांनी बुधवारी येथे केले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक येथील चितळे मंगल सभागृहात बुधवारी पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.www.konkantoday.comदिव्यांग पतीला शिवीगाळ केल्याप्रकरणी पत्नी तसेच धमकी देणार्‍या मेव्हण्यावर गुन्हादिव्यांग पतीला शिवीगाळ केल्याप्रकरणी पत्नी तसेच धमकी देणार्‍या मेव्हण्यावर मंगळवारी चिपळूण येथील स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार चिपळूण तालुक्यातील काविळतळी येथे घडला. नयना नागेश भुवड व कुलदीप दौलत दोनाडकर (लाखणदूर-भंडारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्नी व मेव्हण्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद नागेश दत्ताराम भुवड (३२, काविळतळी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून ते २५ ऑगस्ट २०२२ दरम्यान नागेश भुवडला दिव्यांगत्व आले. त्यानंतर त्याची पत्नी नयना ही त्याचा मानसिक, शारिरीक छळ करून समाजामध्ये अप्रतिष्ठा करून शिवीगाळ करत असे, तसेच त्याचा मेव्हणा कुलदीप दोनाडकर याने नागेश याला मेसेज करून धमकी देत असे. या प्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button