चहापेक्षा किटली गरम, रामदासभाई कदम, हा गरमपणा स्वाभिमानाचा आहे, हुजरेगिरीचा नाही’, लवकरच उत्तर देणार, -भाजप पदाधिकाऱ्यांचा कदम यांच्यावर निशाणा
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत युती धर्म असताना दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करत माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.यावेळी त्यांनी दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांनाही लक्ष केलेरामदास कदम यांच्या या वक्तव्याचा दापोली मतदारसंघातील भाजप पदाधिकऱ्यांनी निषेध केला आहे. ‘चहापेक्षा किटली गरम, रामदासभाई कदम, हा गरमपणा स्वाभिमानाचा आहे, हुजरेगिरीचा नाही’, लवकरच उत्तर देणार, असे स्टेटस ठेवत भाजप पदाधिकाऱ्यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे दापोलीत पुन्हा एकदा महायुतीत भडका उडाला आहे.माजी मंत्री कदम यांनी याआधी भाजप नेते व बांधकाम मंत्री रविंद चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लक्ष केले होते. तर दापोलीत झालेल्या सभेत कदम यांनी पुन्हा कोण तो रविंद्र चव्हाण ? असा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर दापोलीत वातावरण तापले होते. असे असताना पुन्हा रामदास कदम यांनी दापोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांना टार्गेट केल्याने दापोलीतील भाजप पदाधिकारी चांगलेच संतापलेले आहेत. या बाबत त्यांनी आपला राग मोबाईल स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा, अशी मागणी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होती. तर धैर्यशील पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, याला राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पूर्णविराम देत सुनील तटकरे हेच उमेदवार असे जाहीर करून टाकले. केंद्रात मोदींची आणि भाजपची सत्ता आली पाहिजे, यासाठी पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करणार असे दापोलीतील भाजप पदाधिकारी सांगत आहेत. असे असताना देखील दापोलीत झालेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना या पदाधिकारी बैठकीत दापोलीत भाजप पदाधिकारी दिसले नाहीत. त्यामुळे दापोलीत युतीतील तणाव अजूनही कायम आहे.
www.konkantoday.com