दापोलीत १५ एप्रिलनंतर होणार पर्यटकांचा हंगाम सुरू
सध्या फेब्रुवारी महिन्यापासून पर्यटकांविना असणार्या पर्यटनक्षेत्रात अर्थात मिनी महाबळेश्वरमध्ये १५ एप्रिलनंतर पुन्हा गर्दी पहायला मिळेल, असे लाडघर येथील हॉटेल व्यावसायिक नरेश पेडणेकर यांनी सांगितले.दहावी, बारावी तसेच इतर शाांत परीक्षा सुरू असल्याने पयंटकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळलेली नाहीत परंतु १५ एप्रिलनंतर परीक्षा संपत असल्याने आणि शाळांना सुट्ट्या लागत असल्या कारणाने पर्यटकांनी मिनी महाबळेश्वर बहणार आहे. पर्यटकांनी एप्रिल महिन्यामध्ये हॉटेल बुकींग करण्यास सुरूवात केली असल्याचे समोर आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे, मुरूड, लाडघर, हर्णे, पाळंदं, आंजर्ले, केळशी या गावांमध्ये पर्यटकांच्या गाड्या वळतात. मात्र सध्या पर्यटक नसल्याने हॉटेल व्यावसायिक पर्यटकांची वाट पहात बसले आहेत. परंतु १५ एप्रिलनंतर पर्यटक दापोली समुद्रकिनार्यांवर मोठ्या संख्येने दिसून येतील, असा विश्वास दापोलीतील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. www.konkantoday.com