मंदिरातील प्रसाद नाही आम्ही, सगळ्यांमध्ये सारखा वाटून जायला- सामंत समर्थकांच्या पोस्टने लक्ष वेधले
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी अद्यापही जाहीर केली जात नाही या मतदार संघा त पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत त्या दृष्टीने त्यांनी तयारीही सुरू केली होती परंतु परंतु हा मतदार संघावर भाजपने दावा केल्याने अद्यापही या ठिकाणची उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही त्यामुळे अस्वस्थ झालेल्या किरण सामंत यांच्या समर्थकांनी केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे
बस झालं आता… मंदिरातील प्रसाद नाही आम्ही, सगळ्यांमध्ये सारखा वाटून जायला. आमचे जेवढे तुम्ही, तेवढेच तुमचे आम्ही. ना कम, ना जादा… रामकृष्ण हरी… अशी सोशल मीडियावर किरण सामंत समर्थकांकडून व्हायरल झालेली पोस्ट हा इशारा समजायची का? अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील संबंध अधिक ताणल्याची ही चिन्हे आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु उमेदवार कोण हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा महायुतीचा तिढा काही सुटण्याचे नाव घेईना.
भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाने हा विषय प्रतिष्ठेचा करून ताणून धरला आहे. एकदा भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा पुढे येते. तर काही वेळातच शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत यांचे नाव पुढे येते. परंतु महायुती म्हणून गेली आठ दिवस या विषयाची फक्त चर्चाच सुरू आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांमध्ये आहे.
www.konkantoday.com